Belagavi

वाहतूक नियमांच्या दंडावर ५० टक्के सूट; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Share

पोलीस आणि परिवहन विभागाकडे थकीत असलेल्या वाहतूक नियमांचे उल्लंघन संबंधित दंडाच्या रकमेमध्ये ५० टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश कर्नाटक सरकारने जारी केला आहे. २१ नोव्हेंबर २०२५ पासून १२ डिसेंबर २०२५ पर्यंत ही सवलत उपलब्ध असणार आहे.

सरकारने दिलेल्या या मर्यादित कालावधीच्या सवलतीचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रलंबित दंड भरणा करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाकडील ई-चलानमध्ये नोंद झालेल्या दंडाच्या प्रकरणांवर तसेच परिवहन विभागात १९९१-९२ पासून २०१९-२० पर्यंतच्या कालावधीत नोंद झालेल्या आणि भरणा करण्यास प्रलंबित असलेल्या प्रकरणांवरील दंडाच्या रकमेवर ही ५० टक्के सूट उपलब्ध आहे. सरकारने हा निर्णय एका प्रस्तावातील विविध बाबींचा विचार करून घेतला असून, या मर्यादित कालावधीतील सवलतीचा लाभ जनतेने घ्यावा, असे सूचित केले आहे. परिवहन विभागाचे सरकारचे उपसचिव रंगप्पा करिगार यांनी कर्नाटकच्या राज्यपालांच्या आदेशानुसार याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Tags: