जनता दल हा प्रादेशिक पक्ष स्थापन होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांनी बुधवारी बेळगाव येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी २२ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील जेडीएसच्या कार्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपण भाग घेणार असल्याचे सांगितले.

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस पक्षाच्या संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रीय स्तरावरील अध्यक्ष, राज्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच विद्यमान आणि माजी आमदार उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्यात जेडीएस पक्षातर्फे अधिकार भोगून अन्य पक्षांमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते आहेत, असे त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले:”जिल्ह्यात जेडीएस पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.” पक्षाचे अध्यक्ष आणि नेते यांच्या नेतृत्वाखालील या प्रयत्नांमुळे आगामी काळात बेळगाव जिल्ह्यात जेडीएसला बळकटी मिळेल, असा विश्वास माडलगी यांनी व्यक्त केला


Recent Comments