Belagavi

आम. अभय पाटील यांच्या हस्ते ‘साईराज ट्रॉफी’ला प्रारंभ

Share

कनिष्ठ खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शहरात क्रीडा संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या साईराज क्रिकेट ट्रॉफीला आज दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्हॅक्सिन डेपो मैदानात औपचारिक सुरुवात केली.

बेळगाव शहरातील व्हॅक्सिन डेपो मैदानात आमदार अभय पाटील यांच्या हस्ते या ‘साईराज ट्रॉफी’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शहरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी ही स्पर्धा एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे आमदार अभय पाटील यांनी यावेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी सहभागी झालेल्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी उत्साह, समर्पण आणि खऱ्या क्रीडावृत्तीने खेळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त बेळगावच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, अशी आशा आम. अभय पाटील यांनी व्यक्त केली.

Tags: