

डॉ. हिता मृणाल हेब्बाळकर यांनी सुरू केलेल्या ‘स्किन अँड हेअर केअर क्लिनिक’चे उद्घाटन महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. कॉलेज रोडवरील हॉटेल सन्मानच्या मागील बाजूस असलेल्या दासप्पा शानभाग एंपायरमध्ये हे क्लिनिक सुरू झाले आहे.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उद्घाटनप्रसंगी डॉ. हिता हेब्बाळकर यांना शुभेच्छा देत, क्लिनिकबद्दल गौरवोद्गार काढले. डॉ. हिता यांनी या क्षेत्रात सखोल अभ्यास केला असून, त्यांनी क्लिनिकसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणली आहे. नूतन क्लिनिक बेळगाव तसेच उत्तर कर्नाटक भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “जनतेने या सेवेचा फायदा घ्यावा. क्लिनिक यशस्वीरित्या पुढे जावो आणि डॉ. हिता यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण व्हावीत,” अशा शब्दांत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments