
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे. त्यासाठी महिला उद्योजकांना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे मत महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेंगळुरू येथे आयोजित चौथ्या सीआयआय परिषदेत बोलताना, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या विभागामार्फत आवश्यक कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले. पूर्वीच्या प्रथेच्या विपरीत, आता महिलांमध्ये आलेल्या धाडस आणि शक्तीमुळे त्या स्वतःच उद्योजिका होत आहेत, ही जागतिक स्तरावर भारतासाठी आनंदाची बाब आहे. स्वतः दोन कारखान्यांची मालकीण असलेल्या हेब्बाळकर यांनी, बँक बॅलन्सपेक्षा फक्त धाडस महत्त्वाचे असून, त्या बळावर महिला कोणतेही ध्येय साधू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
या परिषदेत राज्यभरातील तसेच राज्याबाहेरील महिला उद्योजकांनी सहभाग घेतला होता.


Recent Comments