विजापूर शहरात १५ नोव्हेंबर रोजी, एम.एम. कलबुर्गी यांच्या ‘वचन साहित्य’ पुस्तकाचे लोकार्पण जिल्हा पालकमंत्री एम.बी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती इतिहासतज्ज्ञ कृष्ण कोल्लार कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे या भागातील जनतेला वचन साहित्य पोहोचवण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी अनेक साहित्यिक आणि कवींना आमंत्रित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी एम.एस. मदबावी, डॉ. महांतेश बिरादार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments