कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रायबाग तालुक्यातील मुगळखोडजवळ घडली आहे.

रायबाग तालुक्यातील मुगळखोड क्रॉसजवळ ही कार आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागेवरच ठार झाले.
मृत पावलेले दोघेही चिकोडी तालुक्यातील वडागोळ गावातील आहेत. त्यापैकी एक, गणपती, हा वडागोळ येथील शासकीय शाळेत अतिथी शिक्षक म्हणून कार्यरत होता. मृत गणपती आणि त्याचा एक मित्र असे दोघांचा अपघातात अंत झाला आहे. या अपघाताचे थरार नाट्य स्थानिक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ही घटना हारोगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments