Vijayapura

बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर विजापूर भाजपमध्ये जल्लोष

Share

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए युतीने मोठे बहुमत मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर विजापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विजयोत्सव साजरा केला. शहराच्या गांधी चौकात झालेल्या या विजयोत्सवात कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

या आनंदोत्सवात विजापूरचे खासदार रमेश जिगजिणगी, माजी आमदार आप्पासाहेब पट्टणशेट्टी, भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलींगप्पा अंगडी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. विजयोत्सवानंतर बोलताना खासदार रमेश जिगजिणगी म्हणाले की, बिहारमध्ये मिळालेल्या या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांना अधिक शक्ती मिळाली आहे. बिहारमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे पक्षाला भव्य विजय मिळवणे शक्य झाले. हा विजय आगामी निवडणुकांची दिशा स्पष्ट करणारा आहे, असेही ते म्हणाले.

पुढे, त्यांनी कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवरही सडेतोड टीका केली. देशात काँग्रेस पक्ष मृतप्राय झाला आहे. मग कर्नाटकात काँग्रेस टिकेल का? एका व्यक्तीने किंवा एका समाजाने राजकारण चालत नाही. सिद्धरामय्या मोठ्या समाजाचे नेते आहेत आणि ते पुन्हा पक्ष उभा करतील, असा कोणाला भ्रम असेल तर तो डोक्यातून काढून टाकावा,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, “उद्या जरी निवडणूक झाली तरी काँग्रेस जिंकणार नाही. देशभरात काँग्रेसचा पाया उखडला आहे.” राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “तो लहान मुलांसारखे कपडे घालून, पोट दाखवत संसदेत फिरतो. तो नेता आहे का? तो नेता होण्यास अयोग्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

Tags: