सैदापूर साखर कारखान्याच्या आवारात दगडफेक करणारे आणि आग लावणारे लोक शेतकरी नाहीत. त्यांच्याविरुद्ध ‘गुंडा’ कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी बेळगावचे शेतकरी नेते शशिकांत पडसलगी गुरुजी यांनी केली.

काल सैदापूर कारखान्याच्या आवारात झालेली दगडफेक आणि ट्रॅक्टर जाळण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हे कृत्य करणारे शेतकरी नाहीत. शेतकऱ्यांच्या मालमत्तेची हानी करणारे लोक शेतकरी आंदोलक असूच शकत नाहीत. हे कृत्य करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर ‘गुंडा’ कायद्याखाली गुन्हा दाखल करावा. त्यांची मालमत्ता जप्त करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. बागलकोटमध्ये शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही पडसलगी गुरुजी यांनी केले.


Recent Comments