


‘दत्तक महिना’ आणि ‘बालदिन’ निमित्त बेळगावमध्ये बेकायदेशीरपणे दत्तक घेण्याची प्रक्रिया थांबवावी, तसेच भारतातील विशेष मुलांना अपत्यहीन लोकांनी दत्तक घ्यावे, यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मोहंमद रोशन यांच्या हस्ते शुक्रवारी रॅलीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी हेल्मेट घालून बुलेट चालवत जनजागृतीचा संदेश दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू झालेली ही रॅली चन्नम्मा चौक आणि बोगार वेसपर्यंत गेली. महिला कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढून विशेष मुलांच्या दत्तक प्रक्रियेच्या कायद्याबद्दल जागरूकता निर्माण केली.
यापूर्वी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी फर्विद यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, समाजातील लोकांनी भारतातील विशेष गरजा असलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना चांगले जीवन देणे गरजेचे आहे. त्यामुळे, विशेष गरजा असलेल्या मुलांना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हा बाल संरक्षण विभागाकडून मार्गदर्शन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
बाल न्याय अधिनियम आणि दत्तक नियमावली कायद्यानुसार कायदेशीररित्या दत्तक घेण्यास सर्वांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या अनाथ मुलांना लपवून-छपवून वाढवणाऱ्या लोकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार दत्तक घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. सहा वर्षांखालील अनाथ मूल आढळल्यास बाल हेल्पलाइन ‘१०९८’ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी के


Recent Comments