Belagavi

बिहार विजयानंतर हिरेबागेवाडीत भाजपचा विजयोत्सव

Share

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिमाखदार विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी येथे माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मोठा विजयोत्सव साजरा केला. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.

बिहार निवडणुकीत भाजपने दिग्विजयाची नोंद केल्यामुळे आज बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. माजी आमदार संजय पाटील यांनी बसवेश्वरांच्या अश्वारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या विजयाच्या सोहळ्याची सुरुवात केली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मिठाई वाटून नागरिकांसोबत या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

Tags: