Belagavi

बेळगावच्या माही कंग्राळकरला कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

Share

शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत आयोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव येथील ‘कंप्लिट कराटे अकॅडमी, कर्नाटक’ या संस्थेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत माही कंग्राळकर हिने सुवर्णपदक पटकावत बेळगाव शहराचा गौरव वाढवला आहे. विशेष म्हणजे, माही सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेसाठी पात्र ठरणारी बेळगावातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

बेळगाव जिल्हा डी.डी.पी.आय. मॅडम यांच्या हस्ते माही कंग्राळकर हिला सुवर्णपदक, ओमेश्वरी कवळे हिला रौप्यपदक आणि प्रज्वल पाटील याला कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रशिक्षक शिहान जितेंद्र काकतीकर, रामेश आलगुडेकर, डॉ. समीर शेख, अक्षय पर्मोजी आणि साहिर शेख यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे.

Tags: