Belagavi

राज्यातील चार रेल्वे स्थानकांच्या नामांतरासाठी केंद्राकडे प्रस्ताव

Share

बेळगाव रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘शिवबसव महास्वामी रेल्वे स्थानक’ असे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.

केवळ बेळगावच नव्हे, तर कर्नाटकातील अन्य तीन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचेही नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला आहे. सरकारी पायाभूत सुविधा विकास, बंदर आणि अंतर्गत जलवाहतूक विभागाच्या अवर सचिवांनी हा प्रस्ताव सादर केला आहे.

त्यानुसार, बिदर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चन्नबसव पट्टददेवरू रेल्वे स्थानक’ असे करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, विजापूर रेल्वे स्थानकाचे नाव ‘ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी रेल्वे स्थानक’ आणि शिवमोग्गा येथील सुरगोंडनकोप्प रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘भायागड रेल्वे स्थानक’ असे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

Tags: