बेळगाव बेळगावमध्ये तीन ठिकाणी आणि गोव्यात दोन ठिकाणी साखळी चोरी करून फरार झालेल्या दोन आंतरराज्य साखळी चोरांना पकडण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. गेल्या आठवड्यात बेळगावच्या सर्वोदय कॉलनी, एपीएमसी आणि खडेबाजार परिसरात साखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासासाठी टिळकवाडीचे इन्स्पेक्टर परशुराम पुजारी आणि पी.एस.आय. विश्वनाथ यांच्यासह त्यांच्या पथकाने अत्यंत सतर्कतेने आणि काळजीपूर्वक कारवाई केली.
तपासादरम्यान, साखळी चोरी केल्यानंतर आरोपी हुबळीच्या दिशेने गेल्याचे उघड झाले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, अमन राऊत आणि नागराज हरिणशिकारी या दोन आंतरराज्य आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींनी टिळकवाडी, एपीएमसी आणि खडेबाजार येथे तीन, तसेच गोव्यातील मडगाव येथे दोन अशा एकूण पाच साखळी चोरीच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ८०.३६ ग्रॅम सोने आणि गुन्ह्यांसाठी वापरलेल्या दोन दुचाकीसह एकूण १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी बक्षीस जाहीर केले आहे.


Recent Comments