Belagavi

अरिहंत हॉस्पिटलतर्फे शुक्रवारी मोफत मधुमेह तपासणी शिबीर

Share

अरिहंत हॉस्पिटलतर्फे जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे.

या शिबिरामध्ये मधुमेह (आरबीएस) व रक्तदाब (बीपी) तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एचबीए 1 सी तपासणीत 20% सवलत तसेच रेटीनोपथी व न्युरोपथी मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

डॉ. युवराजकुमार यड्रावी व डॉ. विनोदकुमार हळीगौडर हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. मधुमेहग्रस्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags: