बेळगावमधील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपीलेश्वर मंदिरात बुधवारी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

कपीलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे आणि प्रमुख पाहुणे अमित देसाई यांच्या हस्ते विशेष रुद्राभिषेक आणि काळभैरव स्तोत्र पठण करण्यात आले. यानंतर विशेष पुष्पार्पण करण्यात आले. अनेक सेवार्थी महिलांनी तसेच उपस्थित महिला भाविकांनी पारंपरिक पद्धतीने काळभैरव पाळणा पूजन केले आणि पाळण्याची गीते गायली. यानंतर विशेष महाआरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या महोत्सवाच्या वेळी मंदिराचे सर्व विश्वस्त आणि सेवार्थी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments