Belagavi

बेळगावात १०० हून अधिक कर्कश सायलेंसरवर बुलडोझर

Share

बेळगाव शहरात कर्कश आवाज करून लोकांना त्रास देणाऱ्या आणि मोठ्या ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या १०० हून अधिक वाहनांचे सायलेंसर बेळगाव वाहतूक पोलिसांनी बुलडोझरखाली चिरडून नष्ट केले.

बेळगाव वाहतूक पोलिसांनी शहरातील सार्वजनिक शांततेत अडथळा आणणाऱ्या आणि तीव्र ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १०० हून अधिक वाहनांचे सायलेंसर जप्त करून ते नष्ट केले. नागरिकांची गैरसोय करणाऱ्या आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या अशा अनधिकृत सायलेंसरविरोधात पोलिसांनी तीव्र मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना स्पष्ट संदेश दिला आहे.

वाहतूक विभागाचे एसीपी शिवाजीराव निकम यांच्या नेतृत्वाखालील या विशेष कारवाईत जप्त करण्यात आलेले १०० हून अधिक मॉडिफाय केलेले सायलेंसर एकत्र ठेवून त्यावर बुलडोझर चालवून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाचे सीपीआय, पीएसआय यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. ध्वनिप्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दिशेने हे कठोर पाऊल असून, यापुढे कोणीही अशा प्रकारचे कर्कश सायलेंसर वापरताना आढळल्यास, त्यांच्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Tags: