अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्यावर दाखल झालेल्या लोकायुक्त प्रकरणाच्या अनुषंगाने, लोकायुक्त पोलिसांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

सीपीआय हळ्ळूर यांनी पैसे घेण्यास नकार दिल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. मात्र, या प्रकरणाचा सविस्तर आणि अंतिम लोकायुक्त पोलिसांकडून अहवाल येणे बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.
गुळेद म्हणाले, “एफआयआर दाखल झाल्यानंतर जर संबंधित अधिकाऱ्याला ४८ तास न्यायालयीन कोठडी झाली, तरच त्याला निलंबित करावे लागते. परंतु, या प्रकरणात तशी कोणतीही घटना घडलेली नाही.” लोकायुक्त पोलिसांकडून संपूर्ण तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments