Belagavi

विजयनगर हिंडलगा येथे बस स्थानकाचे लोकार्पण

Share

बेळगाव येथील विजयनगर हिंडलगा येथे माजी खास. मंगला सुरेश अंगडी यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या बस स्थानकाचे उद्घाटन मंगळवारी पार पडले.

माजी खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी विजयनगरच्या रहिवाशांनी या बस स्थानकाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. याच कार्यक्रमात बोलताना बेळगाव भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, हे बस स्थानक अनेक वर्षांपासून विजयनगरच्या रहिवाशांचे स्वप्न होते.

दिवंगत अजित हलकर्णी आणि मिथुन उसूलकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे या बस स्थानकाचे आज उद्घाटन होत आहे. हे बस स्थानक दिवंगत अजित हलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्घाटित करण्यात आले. एका भाजप कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले. याप्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, लक्ष्मी परमेकर, मिथुन उसूलकर, लता उसूलकर, भाग्यश्री कोकितकर, हलकर्णी परिवार, विलास तहसीलदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: