DEATH

विजापूर येथील ऐतिहासिक आसरा महालाच्या हौदात पडून बालकाचा मृत्यू

Share

विजापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक आसरा महालात खेळत असलेल्या एका दहा वर्षीय बालकाचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही हृदयद्रावक घटना विजापूर शहरातील लोहार गल्ली, बागलकोट क्रॉसजवळ घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक स्थळांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे नागरिक बोलत आहेत.

विजापूर शहरातील ऐतिहासिक आसरा महालात खेळत असलेल्या प्रीतम संजू पवार (१०) या बालकाचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शहरातील बागलकोट क्रॉसजवळील लोहार गल्लीत घडली. स्थानिक युवकांनी तत्काळ धाव घेत बालकाला पाण्यातून बाहेर काढले, मात्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याने प्राण सोडला. या घटनेची नोंद गोलघुमट पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: