DEATH

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश परुळेकर यांचे निधन

Share

लोंढा येथील मूळ रहिवासी असलेले आणि बेळगावमधील ज्येष्ठ पत्रकार, ‘इन न्यूज’चे माजी संपादक तसेच टिळकवाडी येथील निवासी असलेले प्रकाश परुळेकर (६५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

बेळगावच्या प्रतिष्ठित ‘इन न्यूज’चे संपादक म्हणून, तसेच दै. ‘तरुण भारत’ , ‘पुढारी’, ‘हॅथ-वे सिटी न्यूज’ यांसारख्या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून प्रकाश परुळेकर यांनी पत्रकारितेत सेवा दिली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन बहिणी, मुलगी, जावई, आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता.

Tags: