ARREST

बेळगावात अमली पदार्थ सेवनाचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल

Share

अनगोळ परिसरात अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून तिळकवाडी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनगोळ परिसरात अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अनगोळ, कुरुबर गल्ली येथील जावीद उर्फ बेंडिगेरी (२९) , आझाद नगर येथील रहिवासी महम्मद कैफ अजाज शेख (२४)आणि धामणे, मशीद गल्ली येथील महम्मद गुलमर सादिक शरीफ (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैद्यकीय तपासणीत तिघांनीही अमली पदार्थांचे सेवन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या तीन प्रकरणांत एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक परशुराम एस. पूजेरी आणि टिळकवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी प्रशंसा केली आहे.

Tags: