केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बेळगाव दौऱ्यावर असताना, कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेली युवा खेळाडू अंजली शिंदे हिचा सन्मान केला. रविवारी कॅम्प परिसरातील माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला.

मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या अंजली शिंदेने ४३ किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले होते. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या सत्कार समारंभास उद्योजक प्रसन्न घोटगे आणि नगरसेवक रवी साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी, उद्योजक प्रसन्न घोटगे यांनी कुस्तीपटू अंजली शिंदेला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली.


Recent Comments