Uncategorized

आळंदमध्ये ‘मत चोरी’साठी परराज्यातील मोबाईल नंबरचा वापर

Share

गुलबर्गा येथील आळंद मतदारसंघात ‘मत चोरी’साठी देशातील विविध राज्यांच्या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला, तसेच पहाटेच्या वेळी मतदारांची नावे वगळली जात होती, ही बाब एसआयटी तपासातून उघडकीस आली आहे, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केला.

के.पी.सी.सी. ‘भारत जोडो भवन’ येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मत चोरी’ अभियान आणि स्वाक्षरी संकलनाबाबत माहिती दिली. ‘मत चोरी’ विरोधात देशव्यापी अभियान सुरू आहे आणि कर्नाटकातही ते सक्रिय आहे. कर्नाटकमधील महादेवनगर मतदारसंघात ‘मत चोरी’ झाली होती, जी काँग्रेसने उघडकीस आणली. त्याचप्रमाणे, गांधीनगर आणि आळंद मतदारसंघातही ‘मत चोरी’ झाली आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणांचा पर्दाफाश करून देशाचे लक्ष वेधले होते. आता आळंदमध्ये पहाटेच्या वेळी मते वगळणे आणि विविध राज्यांतील फोन नंबर वापरून ‘मत चोरी’ करण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व एसआयटी तपासातून समोर आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘मत चोरी’बद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही देशभरात अभियान राबवले आहे. आता स्वाक्षरी संकलन अभियान सुरू करण्यात आले असून, मुख्यमंत्री आणि मी स्वतः या अभियानाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. आजपर्यंत एकूण १ कोटी १२ लाख ४१ हजार स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या आहेत. मोबाईल क्रमांकासहित या सह्या गोळा करण्यात आल्या आहेत. पुढे रामलीला मैदानावर एक मोठी सभा आयोजित केली आहे. तोपर्यंत शक्य तितक्या सह्या तिथे पोहोचवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: