बेळगाव येथील के.एल.एस. संस्थेच्या राजा लखमगौडा लॉ महाविद्यालयात संत कनकदास यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रभारी प्राचार्य प्रा. पी. ए. यजुर्वेदी यांनी कनकदासांचे जीवन आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. “कनकदासांची शिकवण आणि त्यांची महान तत्त्वे आजही जीवनात अनुकरणीय आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या समारंभादरम्यान ‘लॉ सहाय्यता कक्ष’ आणि ‘साहित्य क्लब’च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
सांस्कृतिक विभागाच्या संयोजिका प्रा. समीना नाहिद बेग यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments