महाराष्ट्रातील मिरज येथे असलेल्या ‘सचिन रुग्णालया’त वंध्यत्वग्रस्त दाम्पत्ये आणि महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्रीरोग व वंध्यत्व मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रातर्फे रविवार, ९ नोव्हेंबर रोजी मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अपत्यहीन दाम्पत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मिरज येथील ‘सचिन रुग्णालया’तर्फे आयोजित या शिबिरात अपत्यहीन जोडप्यांना मोफत मार्गदर्शन, तपासणी, तसेच उपचार आणि शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातील.
या शिबिरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित डॉक्टरांची तज्ज्ञ टीम सहभागी होणार आहे. औषधोपचार, आय.ई.यू. (I.E.U.) आणि टेस्ट ट्यूब बेबीला पर्याय असलेल्या आधुनिक उपचारपद्धती आणि तंत्रज्ञान, पुरुषांमधील विविध तपासणी सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार उपलब्ध असतील. यामध्ये फॅलोपियन ट्यूब जोडण्याचे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान, स्त्रियांमध्ये होणारे बीज उत्पादन आणि त्याचे न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी (ट्युमर), गर्भाशय मुखाचे दोष, वारंवार होणारा गर्भपात, मासिक पाळीच्या तक्रारी, महिलांमध्ये श्वेतप्रदर (पांढरे जाणे), कॅन्सर आणि वजन कमी करण्याचे उपाय यांवर चर्चा व मार्गदर्शन केले जाईल. तसेच, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा नसणे, पुरुष व महिलांमधील लैंगिक समस्या, गुप्त रोग, इंद्रियांचे दोष, अकाली वीर्यस्खलन, अशक्तपणा आणि विवाहपूर्व व विवाहपश्चात समस्यांवर तपासणी करून उपचार केले जातील.
सचिन रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रयोगशाळा, शुक्राणू बँक आणि स्त्री बीजदान सुविधा उपलब्ध आहे. शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यांनी मिरज येथील छत्रपती शिवाजी रस्ता, हॉटेल प्रियदर्शनीजवळ असलेल्या सचिन रुग्णालयात संपर्क साधून शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन (एम.डी. – संपर्क क्र. ९४२२५८०८४२ / ९७६५०१००८३४) आणि डॉ. नेहा (एम.डी. – संपर्क क्र. ९४२१९३२४०१) यांच्याशी संपर्क साधावा.


Recent Comments