धारवाड शहर (सीबीटी) बस स्थानकाच्या १३ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीचे आज, शुक्रवार रोजी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

मागील दोन वर्षांपूर्वी याच इमारतीच्या बांधकामासाठी मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी भूमिपूजन केले होते. दोन वर्षांनंतर ही सुसज्ज इमारत पूर्ण झाली असून, आता रामलिंगा रेड्डी यांनीच तिचे उद्घाटन केले आहे. रिबन कापून मंत्र्यांनी सीबीटी स्थानकाचे उद्घाटन केले. परिवहन मंत्र्यांच्या सोबत धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड, आमदार अरविंद बेल्लद, विधान परिषद सदस्य सलीम अहमद, एस.एफ. जक्कप्पनवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments