Belagavi

‘सेल्फी’ प्रकरणी जे.एम.कालीमिर्ची यांची बदली

Share

बेळगावच्या माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.

कर्नाटक सरकारच्या गृह विभागाने नुकतेच राज्यातील १२० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करत प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. १ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिन’ आंदोलनात सहभागी झालेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यासमवेत सेल्फी घेतल्यामुळे चर्चेत आलेले बेळगाव माळमारुतीचे सीपीआय जे. एम. कालीमिर्ची यांची बदली करण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यांच्या जागेवर सी.ई.एन. पोलीस निरीक्षक बावउद्दीन गड्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, काकतीचे सीपीआय एस. आय. गुरुनाथ यांची नियुक्ती मुधोळ येथील सर्कल इन्स्पेक्टर म्हणून करण्यात आली आहे.

Tags: