Chikkodi

चिकोडीतील विविध विकासकामांचा शुभारंभ

Share

चिकोडी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ४.९० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली.

चिकोडी तालुक्यातील एकसंबा शहरात विविध विकासकामांसाठी ४.९० कोटी रुपयांच्या अनुदानाचे मंजुरी पत्रक वितरित करताना ते बोलत होते. चिकोडी तालुक्यातील जुने यडूर गावातील श्री. पवाडसिद्ध मंदिराच्या इमारतीच्या बांधकामासाठी पंधरा लाख रुपये, चंदूर गावातील डॉ. बी. आर. आंबेडकर समाज भवन इमारतीच्या बांधकामासाठी चाळीस लाख रुपये आणि चंदूर गावातील पठार ढोणी वसाहत मार्गे चंदूर टेक सैनिक टाकळी रस्त्याच्या सुधारणेसाठी एक कोटी दहा लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. तसेच, मांजरवाडी गावाच्या हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरण आणि नाले बांधणीच्या कामासाठी एक कोटी रुपये आणि पट्टणकुडी गावातील श्री. दत्त मंदिरा जवळील समाज भवन इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

चिकोडी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सहा पीकेपीएस संस्थांच्या इमारती बांधकामासाठी दोन कोटी पंधरा लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यानुसार, चिकोडी तालुक्यातील बेळगल्ली गावातील जय हनुमान पीकेपीएस संस्थेला पस्तीस लाख, जोडट्टी गावातील श्री. बिरेश्वर पीकेपीएसला पंचवीस लाख, नागरमुन्नोळी शिवयोगेश्वर पीकेपीएसला पस्तीस लाख, श्री. सिद्धेश्वर पीकेपीएसला पस्तीस लाख आणि येडूर गावातील श्री. वीरभद्रेश्वर पीकेपीएसला पस्तीस लाख रुपये, तसेच मांजरवाडी गावात समाज भवनासाठी पन्नास लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, त्याचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार गणेश हुक्केरी, सिद्दप्पा मर्याई, दुंडप्पा कोटप्पगोळ, महादेव ईटी, कल्लपा करगांवे, अनिल पाटील, बाबू डोणे, अनिल माने, महेश कागवाडे, अशोक हवळे, महादेव हवळे, तेजगौडा पाटील, संजू पाटील, मारुती कांबळे, जुने यडूर गावातील पवाडसिद्धेश्वर मंदिर समिती सदस्य, चंदूर गावातील डॉ. बी. आर. आंबेडकर समाज समिती सदस्य, तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ, मांजरवाडी येथील ग्रामस्थ, नागरिक आणि बेळगल्ली, जोडट्टी, नागरमुन्नोळी, येडूर व मांजरवाडी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.

Tags: