Belagavi

ऊस दराच्या मागणीसाठी ६० हून अधिक ट्रॅक्टर रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

ऊस दराच्या मागणीसाठी निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ सर्कलमध्ये शेतकरी संघटनांनी सुरू केलेले धरणे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे.

विविध साखर कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणारे ६० हून अधिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी मार्गावरच अडवले आहेत. ट्रॅक्टर अडवल्यानंतर जवाहर साखर कारखान्याचे संचालक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ऊस घेऊन जाणारी वाहने सोडण्याची शेतकऱ्यांकडे विनंती केली. मात्र, दराचे निश्चितीकरण होईपर्यंत ऊसतोडीला अनुमती दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी नेते राजू किचडे यांनी व्यक्त केली.

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाने तात्काळ यात हस्तक्षेप करून दराचा प्रश्न मार्गी लावावा असे मत शेतकरी नेते रमेश पाटील यांनी मांडले.

Tags: