कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांना धारवाड जिल्ह्यात येण्यास जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी निर्बंध घातले आहेत.

जागतिक लिंगायत महासभेने काडसिद्धेश्वर स्वामीजींवर लिंगायत समाजाच्या भावना दुखावतील, अशा प्रकारचे विधान केल्याची तक्रार करत धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या जिल्हा प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी केली होती. ५, ६ आणि ७ नोव्हेंबर या दिवशी धारवाड जिल्ह्यातील अण्णिगेरी तालुक्यातील हळ्ळीकेरी गावात श्री सहजानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कण्हेरी मठाच्या स्वामीजींना अधिकृत आमंत्रणही देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या धारवाड जिल्हा प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे, आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून मनाई करणारे आदेश जारी केले आहेत.


Recent Comments