
भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या निवडणुकीत डॉ. वेंकण्णा डी. डांगे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनलने दणदणीत विजय मिळवला.

निवडणूक अधिकारी सिद्दू हुल्लोळी यांनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव केला. याच दिवशी संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. डांगे यांची चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. संजय सिद्धण्णावर यांची उपाध्यक्ष, शिवानंद मूलीमनी यांची सचिव, तर ले. कर्नल विनोदनी शर्मा यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रवीण हिरेमठ हे सहसचिव आणि दत्तात्रय मिसाळे हे राज्य कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून नेमले गेले, अशी माहिती चेअरमन डांगे यांनी दिली. या बैठकीत महांतेश मीरापूर यांनी राज्य निरीक्षक म्हणून सहभाग घेतला.


Recent Comments