Belagavi

बेळगावात अ. भा. एएआय आंतर-विभागीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात

Share

क्रीडा हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी केले.

भारतीय विमानतळ प्राधिकरण आयोजित अखिल भारतीय एएआय आंतर-विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांबरा केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संचलनाचे कौतुक केले. क्रीडा हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तणावपूर्ण जीवनात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.

बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन बोलताना म्हणाले, “या स्पर्धेत भारताच्या विविध भागांतील एएआय कर्मचाऱ्यांचे एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये दक्षिण विभाग, उत्तर विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, ईशान्य विभाग आणि कॉर्पोरेट मुख्यालय या संघांचा समावेश आहे,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी विविध संघांचे खेळाडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: