Belagavi

व्हीलचेअर बास्केटबॉल: आशिया-ओशन झोन स्पर्धेसाठी कर्नाटकच्या ४ खेळाडूंना संधी

Share

Aथायलंडमधील बँकॉकमध्ये होणाऱ्या व्हीलचेअर बास्केटबॉल आशिया-ओशन झोन चॅम्पियनशिप २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्यातील चार खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले आहे.

व्हीलचेअर बास्केटबॉल: आशिया-ओशन झोन स्पर्धेसाठी कर्नाटकच्या ४ खेळाडूंना संधी
कर्नाटक संघातून पुरुष संघात बसप्पा सुनदोळी आणि सिद्धप्पा पटगुंदी यांची निवड झाली आहे, तर महिला संघात ललिता गवस आणि लक्ष्मी रायण्णावर यांनी स्थान मिळवले आहे. विश्‍वास फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश बाडगी यांनी निवड झालेल्या या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

मागील महिन्यात १ ते १० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कर्नाटकच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत पुरुष संघाने द्वितीय, तर महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला होता. याच स्पर्धेत या चारही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती, ज्याच्या आधारावर त्यांची आता भारतीय संघात निवड झाली आहे. कर्नाटक राज्य व्हीलचेअर बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा कांचन खोत आणि सचिव संजीवकुमार हजारे तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी भारतीय संघाने या स्पर्धेत प्रथम स्थान मिळवावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय संघाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान मिळवावे, अशी शुभेच्छा कांचन खोत आणि संजीवकुमार हजारे यांनी व्यक्त केली.

Tags: