चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील अल्पसंख्याक मोराजी निवासी शाळेत दुसऱ्यांदा अन्न विषबाधेची घटना घडली असून, १६ विद्यार्थी अचानक आजारी पडले आहेत.

आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १४ विद्यार्थिनी आणि २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने चिकोडी येथील खासगी रुग्णालयात तसेच तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वीच ‘कोड’ परीक्षेच्या आदल्या दिवशी येथे अशीच घटना घडली होती. आजही तीच घटना पुन्हा घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच येथील न्यायाधीशांनी या निवासी शाळेला भेट देऊन, येथील वॉर्डनसह सर्व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
मागील वेळी अन्न विषबाधा झाल्याने तब्बल १२० विद्यार्थी आजारी पडले होते. आता पुन्हा मुले आजारी पडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चिकोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments