Athani

सीमाप्रश्नी आमदार लक्ष्‍मण सवदींचे बेताल वक्तव्य

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी तोंडसुख घेत महाराष्ट्र एकीकरण समितीने जर बेळगाव मागितल्यास आपण मुंबई मागू असे बेताल वक्तव्य करून मराठी भाषिकांचा रोष ओढवून घेतला आहे.

शनिवारी अथणी येथे माध्यमांशी बोलताना आम. लक्ष्मण सवदी म्हणाले, म. ए. समितीने बेळगावची मागणी बंद करावी. जर त्यांनी हि मागणी थांबवली नाही तर आम्ही मुंबई कर्नाटकात सामील करण्याची मागणी करू असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समिती हि भाडोत्री कार्यकर्त्यांना जमवून काळा दिन पाळते असा भलताच शोध देखील त्यांनी लावला असून आम. लक्ष्मण सवदींच्या या वक्तव्यामुळे मराठी भाषिकातून संताप व्यक्त होत असून आम. सवदी यांना सीमाप्रश्न आणि सीमालढ्याविषयी योग्य माहिती नसल्याने अशापद्धतीने बेताल वक्तव्य करत असल्याची टीकाही मराठी भाषिक करत आहेत.

Tags: