Vijayapura

विविध कंपन्यांमध्ये १० हजार युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य: एम. बी. पाटील

Share

विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी कन्नड राज्योत्सवानिमित्त पत्रकार परिषद घेऊन विजापूर जिल्ह्याच्या विकास योजना, वारंवार होणारा भूकंपाचा धोका आणि बेळगाव सीमावाद यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

एम. बी. पाटील यांनी विजापूर जिल्ह्याच्या विकासावर बोलताना सांगितले की, बारामतीच्या धर्तीवर विजापूर जिल्ह्याचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात दीड कोटींहून अधिक वृक्षारोपण करून हरितीकरण करण्यात आले आहे, तसेच लवकरच ‘क्षीर क्रांती’ आणि ‘कृषी पायलट योजना’ लागू केली जाईल. टोयोटा आणि फॉक्सकॉनसारख्या कंपन्यांमध्ये युवकांना रोजगार मिळाला असून, त्यांचे लक्ष्य विविध कंपन्यांमध्ये १० हजार युवकांना नोकरी मिळवून देण्याचे आहे. तसेच, विजापूरमध्ये वारंवार होत असलेल्या भूकंपाबद्दल त्यांनी ‘घाबरण्याचे कारण नाही, हा केवळ स्थानिक समायोजन आहे,’ असे स्पष्टीकरण दिले.

सीमावादावर बोलताना त्यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे व आजवत म. ए. समितीवर तोंडसुख घेतले. समितीच्या अशा कारवाया केवळ मतांच्या राजकारणासाठी चालतात आणि अशा गोष्टींना सरकार संधी देणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले. मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिपदाच्या मागणीबद्दल बोलताना त्यांनी हायकमांडच्या निर्णयाचे समर्थन केले आणि ‘मी सार्वजनिकपणे मागणी करून लहान होणार नाही’ असे म्हणत बसवादी शरणांच्या विचारांवर आधारित काम करण्यावर भर दिला.

Tags: