Uncategorized

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने सिद्धरामय्यांचा पारा चढला

Share

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांवर पत्रकारांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला. यामुळे संतप्त झालेले मुख्यमंत्री आज माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर पत्रकारांनी थेट विचारणा करताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या चांगलेच संतप्त झाले. मुख्यमंत्र्यांनी या अफवांवर मौन न बाळगता थेट संताप व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या आरक्षणासंबंधी मागणीवर विचार करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संतप्त होऊन पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केले. हि माहिती कुणी? कधी? कुठे? कोणत्या वृटत्तपत्रातून मिळाली? असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यानंतर त्या वृत्तपत्राचे नाव सांगितले असता, सिद्धरामय्या यांनी कोणताही प्रतिसाद न देता तेथून निघून जाणे पसंत केले.

तत्पूर्वी, भटक्या-विमुक्तांच्या महासंघाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी ‘सी’ प्रवर्गातून स्वतंत्रपणे शेकडा १ टक्का आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “आमचे सरकार सामाजिक न्याय देणारे आहे. त्यामुळे १ टक्का आरक्षण देण्यासाठी न्यायालयीन विभाग आणि तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल. या सगळ्यासाठी वेळ लागेल, मात्र माझ्यावर विश्वास ठेवा.” असे आश्वासन दिले.

Tags: