Vijayapura

विजापूर जिल्हा पोलीस दलातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन

Share

माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात आला, तसेच ‘एकता दौड’ चे आयोजन विजापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते.

देशाचे स्वातंत्र्य, एकात्मता आणि सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, आय.आर.बी. (IRB) युनिटचे अधिकारी व कर्मचारी आणि विविध शाळांमधील विद्यार्थी या ‘एकता दौड’मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. शहरातील डॉ. बी.आर. आंबेडकर क्रीडांगणापासून सुरू झालेली ही एकता दौड गांधी चौक, डॉ. बी.आर. आंबेडकर चौक मार्गे येत गोलघुमट परिसरात समारोप पावला. यावेळी सामूहिकरित्या “राष्ट्रीय एकता दिनाची” प्रतिज्ञा घेण्यात आली.

Tags: