




ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना वाचन व अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील कोडचवाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आज नूतन ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समन्वयक समितीचे बेळगाव जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आम. विठ्ठल हलगेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी राजशेखर हिंडलगी यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर आपले मत व्यक्त केले. या सोहळ्याला अवरोळी रुद्रस्वामी मठाचे चन्नबसव देव, जनप्रिय आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर, तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमोद कचेरी यांच्यासह विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
			 
 
 
  
					 
				 
						  
						  
						  
						  
						 
						 
						 
Recent Comments