Belagavi

प्रख्यात उद्योजक बाळासाहेब भरमगौडा पाटील यांचे निधन

Share

बेळगाव, हिंदवाडी येथील रहिवासी, दानशूर आणि प्रख्यात उद्योजक तसेच बी.टी. पाटील पॅटसन औद्योगिक समूहाचे संस्थापक बाळासाहेब भरमगौडा पाटील (९३) यांचे आज सकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, सचिन आणि तुषार हि दोन मुले, विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे, बंधू प्रभाकर पाटील आणि भगिनी शालिनी लाडगे असा मोठा परिवार आहे.

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते. तसेच, त्यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष म्हणून सेवा बजावली होती.

सुंदराबाई पाटील बी.एड. कॉलेज, महावीर भवन यांसह विविध संस्थांच्या उभारणीत आणि जैन समाजाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पार्थिवावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: