Belagavi

निवृत्त पीएसआय बाबण्णा ढंग यांचे मरणोत्तर देहदान

Share

आझम नगर येथील रहिवासी आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबण्णा बाळाप्पा ढंग (८४) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान व अवयवदान करण्यात आले.

मृत बाबण्णा ढंग अंतिम इच्छेनुसार, बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेळगावच्या केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या नेत्रपेढीस नेत्रदान, त्वचेच्या बँकेस त्वचादान आणि मृतदेह हुबळी येथील केएलई जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी मुरुसाविरमठ वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला.

या अवयव आणि देहदानाबद्दल डॉ. रामण्णावर ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी ढंग कुटुंबीयांचे आभार मानले. त्यांच्या पश्चात तीन कन्या आणि मोठा आप्तपरिवार आहे. देहदान आणि अवयवदानाबद्दल अधिक माहितीसाठी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या ९२४२४९६४९७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Tags: