Hukkeri

हुक्केरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Share

कर्नाटक राज्यात २०११ ते २०२३ या काळात सेवानिवृत्त झालेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९७२ च्या कायद्यानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी आज हुक्केरी शहरात महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयाच्या आवारात मोठे आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन तालुका समितीच्या अध्यक्षा चंद्रव्वा मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रव्वा मगदूम म्हणाल्या की, “सन २०११ ते २०२३ पर्यंत काम करून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना ग्रॅच्युइटीची रक्कम न देऊन सरकारने अन्याय केला आहे. त्यांच्या वृद्धापकाळातील आरोग्य आणि साध्या जीवनासाठी ही रक्कम अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम त्वरित द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर हुक्केरी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तालुका सचिव गोदावरी राजापूरे, अक्का महादेवी कोचरि, शांता हिरेमठ, सरस्वती मडलूर, देवकी चौगुला, निंगव्वा पुजारी, कमला कौजलगी, पद्मिनी भोगले, अक्काताई चिक्कोडी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Tags: