Belagavi

आम. अभय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ते कामास सुरुवात

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघाच्या हद्दीतील वॉर्ड क्र. २१ मधील खासबाग पाटील गल्लीत आज रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली.

बेळगावच्या दक्षिण भागात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. वॉर्ड क्र. २१ मधील खासबाग पाटील गल्लीत रस्ते काम सुरू करण्यात आले आहे. पाटील गल्लीत भूमिगत गटार पाण्याची समस्या मोठी होती. सायकल फेरीदरम्यान येथील लोकांनी आमदारांचे लक्ष या समस्येकडे वेधले होते. याची दखल घेऊन आमदार अभय पाटील यांनी तातडीने प्रतिसाद दिला आणि प्रथम युजीडी लाईनची निर्मिती केली. आता रस्ताही विकसित करण्यात येत आहे.

“दक्षिण भागातील जनतेच्या कोणत्याही समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी आमदार अभय पाटील नेहमी तयार असतात,” असे आमदार अभय पाटील यांचे बंधू भरत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नगरसेवक विनायक कामकर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Tags: