Belagavi

बेळगावात एकाच दिवशी ५ ठिकाणी पोलिसांची मोठी कारवाई

Share

बेळगाव शहर पोलिसांनी एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांवर वैद्यकीय तपासणीनंतर एनडीपीएस कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली. माळमारुती पोलीस ठाण्यांतर्गत श्रीनगर गार्डनजवळ सोहेल सुबानी पीरजादे (२५) याला, तर टिळकवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सायन्स पार्कमध्ये राहुल शिवाजी जालगार (२५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे, हिरेबागवाडी पोलीस ठाण्याने कुकडोळी गावच्या हद्दीत रामप्पा शिवनप्पा नागानूर (६३) याला, उद्योगबाग पोलीस ठाण्याने ब्रह्मनगर क्रॉसजवळ आकाश मधुकर गांवकर (२५) याला, आणि काकती पोलीस ठाण्याने काकती गावाजवळ रोहित रेवानी होळी (२३) याला अटक केली.

या सर्व आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी असभ्यपणे वागताना मादक पदार्थांचे सेवन केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(b) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

एकाच दिवशी प्रभावी कारवाई करून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: