hubbali

हुबळीत गोठ्यात लागलेल्या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू

Share

हुबळीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून गोठ्यात बांधलेली एक म्हैस आगीत भस्मसात झाली.

हुबळीच्या दुर्गदबैल परिसरात ही घटना पहाटे घडली. या आगीत एक म्हैस जिवंत जळून खाक झाली. स्थानिक लोकांनी एकत्र येत ही आग विझवली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. हा प्रकार शहरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

Tags: