Nippani

निपाणीत १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Share

निपाणीत एका हृदयद्रावक घटनेत नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

निपाणीतील माने प्लॉटनजीकच्या आझाद गल्लीत ही घटना घडली. साद वासीम बागवान (वय १५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. साद बागवान याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना समजल्यावर परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Tags: