Chikkodi

ऊस दराच्या घोषणेसाठी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन

Share

ऊस दराची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू नये, या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, कलोळ गावातून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे रात्रंदिवस होणारी ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी शमनेवाडी गावाजवळ अडवली.

चिकोडी तालुक्यातील कल्लोळ गावातून महाराष्ट्रातील कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शमनेवाडी गावाजवळ शेतकऱ्यांनी थांबवले आणि ट्रॅक्टर चालकास चांगलेच धारेवर धरले.

कर्नाटकात ऊसाला समर्थन मूल्य जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जोरदार संघर्ष करत आहेत. त्याशिवाय, त्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली असून, दराची निश्चिती न करता कारखाने सुरू करू नयेत, अशी विनंती केली आहे.

याच दरम्यान, चिकोडी तालुक्यातील कलोळ गावातून महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेला ट्रॅक्टर शमनेवाडी गावात शेतकरी संघटनांनी अडवला. ऊसाला दर जाहीर झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत ऊस वाहतूक करू नये, असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाला दिला.

Tags: