बेळगावात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सदस्य नोंदणी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने भाग घेऊन पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रमात काकती, कारवी, बैलहोंगल, सबगाव, वैभव नगर, उज्वल नगर आणि आसपासच्या भागांतील लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या काही बड्या नेत्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एआयएमआयएममध्ये प्रवेश केला.
हा कार्यक्रम बंदेनवाज सय्यद आणि अब्दुल तव्वाब शेख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी नवीन सदस्यांना पक्षाचे ध्येय, उद्दिष्ट्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष आलम संदी, शहराध्यक्ष इम्रान पीरजादे, शहर सरचिटणीस शारुख पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि सदस्य उपस्थित होते.


Recent Comments