
चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे एकूण २३.२१ कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारने मंजूर केले आहे, अशी माहिती कर्नाटक दिल्ली प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली.

या संदर्भात तालुक्यातील यक्सांबा शहरात प्रकाश हुक्केरी यांनी संबंधित ग्रामस्थांना अनुदानाचे आदेश पत्र वाटप केले, त्यावेळी ते बोलत होते.
चिक्कोडी तालुक्यातील केरूूर गावातील ३३/११ केव्ही विद्युत वितरण केंद्राला ११० केव्ही वितरण केंद्रात श्रेणीसुधारित करण्याच्या योजनेसाठी २०.७५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी विचारात घेऊन केपीटीसीएलतर्फे यासाठी आधीच निविदा काढण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर केरूूर, काडापूर, जोडकुरळी, अंकली यासह आसपासच्या गावातील शेतकरी आणि नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत होईल आणि कृषी तसेच औद्योगिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल.
एकसंबा नगर पंचायतीच्या हद्दीतील चन्नम्मा सर्कल ते अंजली टॉकीज रस्त्याच्या पेव्हर ब्लॉक कामासाठी १.४६ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मलिकावाड गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या विकास कामांसाठी यापूर्वी ५ लाख रुपये मंजूर झाले होते, ज्यात आता इमारत बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३० लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान जोडून एकूण ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
त्याचप्रमाणे, इंगळी गावातील श्री बसवेश्वर मंदिर सामुदायिक भवनाच्या पहिल्या मजल्याच्या कामासाठी आता ५० लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान देऊन एकूण १.१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इंगळी गावातील मराठा समाजाच्या यात्रीनिवास सामुदायिक भवनाच्या कामासाठी यापूर्वी ५० लाख रुपये मंजूर झाले होते, त्यात पेव्हर ब्लॉक आणि रंगरंगोटीच्या कामासाठी २० लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान देऊन एकूण ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी मल्लिकार्जुन पाटील, मल्लप्पा बागी, वीरेंद्र पाटील, विठ्ठल वाळके, बी. डी. पाटील, चनगौडा पाटील, रवी पाटील, सुरेश बाडकर, निंगप्पा पाटील, प्रकाश बॅळे, अली मुल्ला, महेश पाटील, संतोष वड्डर, यक्सांबा न.प. अध्यक्ष सुनील सप्तसागर, उपाध्यक्ष सुजाता विनोद चितळे, सदस्य चिदानंद बेळ्ळे, महादेव माळगे, उमेश सातवर, शिवगौडा बावाचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments